प्रिय
मैत्रणी,
सुरक्षेचे
'दान'
द्या
अरेच्या,
आज पहिल्याच
रिंगला फोन उचललास.
नाही
म्हणजे जास्त वेळ फोन सुरू
राहिला असता आणि तुझ्या त्या
बापाने पाहिला असता तर तू
घाबरली असतीस ना प्रिये...बरोबर
ना.. हे
बघ, आता
तू अजितबात घाबरू नकोस.
तुझ्या
सुरक्षेसाठी मी छातीचा कोट
करून उभा राहीन...अगं
एवढंच नव्हे,
तर तुला
सुरक्षा पुरवण्याची मागणी
करायला मी सवडच देणार नाही.
तू तर
माझ्यासाठी जीव की प्राण आहेस.
त्यामुळे
तू समाजाच्या दृष्टीने
महत्त्वाची नसलीस ना तरी
माझ्यासाठी मात्र खूपच जीवलग
आहेस,
हे विसरू
नकोस.
काय आहे,
आजकाल
कमी महत्त्वाच्या पदवाल्यांना
पण सुरक्षेची जरा हावच सुटलेली
असते.
मग ती
हाव किंवा हौस भागवण्यासाठी
रुसवे-फुगेव्याचे
नाटक करावं लागतं.
हे बघ,
तुझे
रुसवे,
तुझे
फुगवे मी झेलायला तयार आहे
गं. पण
तू सुरक्षेचा दानवे (दानाचा
मार्ग)
पदरात
पाडून घ्यायला एवढा आटापिटा
करू नकोस.
त्याचं
काय माहीत आहे,
तू अजून
सामान्यच आहेस गं.
अतिसामान्य
झालीस ना की मग मीच तुझा बॉडीगार्ड
बनून फिरेन हं.
अगदी
झेड प्लस सुरक्षाच पुरवेन.
पण
लग्नाअगोदर तू असला हट्ट धरू
नको.
त्याचं
काय आहे ना प्रिये,
मला ना
स्वत:चं
अकारण महत्त्व वाढवणारी माणसं
खूप काही आवडत नाहीत.
आणि मला
माहीत आहे,
तू स्वत:चं
असं महत्त्व वाढवणार नाहीस
ते...कारण
काय माहीत आहे,
आपली जी
काय जनताजनार्दन आहे ना ती
काय करेल ते सांगता येत नाही.
त्यामुळे
तू सुरक्षा पुरवण्याचं दान
बडवण्यापेक्षा शांत राहणं
चांगलं नाही का?
एवढंच
जर तुला तुझ्या परिवारात
असुरक्षित वाटत असेल तर तू
खुशाल माझ्याकडे ये...मी
वाटच पाहत आहे.
तुझाच
झेड प्लसवाला,
प्रेयस
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा