हायकू आणि कायकू
प्रिय
मैत्रणी,
काय
गं, आज
काय लय भारी मूडमध्ये दिसतेस
तू. नाही
गं,
मगापासून
तीनच ओळी पुन्हा पुन:
गुणगुणतेस
म्हणून विचारलं.
कुठल्या
तरी सुंदर गाण्याचा मुखडा
गातेस का तू?
काय,
काय
म्हणालीस...?
तू कविता
लिहिलीस ?
आता
बोंबला.
कशाला
काय विचारतेस?
तू कविता
करणार म्हणजे तू कवयित्री
होणार त्यामुळे मला निदान
तीन ते चार भूमिका पार पाडाव्या
लागणार!
म्हणजे,
म्हणजे
काय विचारतेस?
तुझ्यावर
निस्सिम प्रेम केलं आता तुझ्या
कवितांवरही प्रेम करावं लागणार
ना...निदान
नाही म्हटलं तरी कविता आवडली
असं तरी म्हणावं लागणार.
एकदा
तुझ्या प्रेमाचा याचक झालो
आता तुझ्या कवितांचा वाचक
होतो.
दुसरं
असं की,
तू जी
कविता लिहिणार आहेस त्याचा
फॉर्म समजावून घ्यावा लागणार.
त्यासाठी
मला वृत्ते,
अलंकार,
छंद-फंद
मुक्तपणे अभ्यासावे लागणार.
त्यातच
तुझी कविता हृदयाला भिडणारी
असू दे,
प्रेम
सांगणारी,
वास्तव
दाखवणारी,
भावभावना
व्यक्त करणारी,
आरोप-प्रत्यारोप
करणारी,
निसर्गाच्या
सान्निध्यात बागडणारी असू
दे...अगदी
अगदी कशीही असू दे...म्हणजे
मुक्तछंदात मुक्तपणे फुलणारी
असू दे,
मी तुझ्या
कवितेचा नक्कीच चाहता राहीन.
कारण
काय विचारतेस...कारण
की कवितेतील तू माझी आहेस
म्हणून.
पण काहीही
म्हण,
मुक्तछंदात
कविता करणाऱ्या कवींच्या
प्रतिभांना भारी बहर येतो.
मला
कविता करायला जमली ना तर
तुझ्यावर निदान एक काव्यसंग्रह
नक्की लिहीन.
कारण
माझ्या कवितेची तूच प्रेरणा
असशील ना...बरं
ते राहू दे गं,
मला
सांग,
आपल्या
प्रेम प्रकरणाला आणि दुसऱ्यांच्या
नजरेतील लफड्याला इतके दिवस
झाले तेव्हा तू कधी बोलली
नाहीस की एखादी कविता ऐकवली
नाहीस...तुला
तुझा काव्यसंग्रह प्रकाशित
करायला प्रकाशक भेटला नव्हता
का इतक्या दिवस?
जाऊ दे
गं. तू
रागावू नकोस...कारण
काय,
कविताही
आकाशाची वीज आहे,
ते धरू
पाहणारे त्यात होरपळतात,
असे कवी
केशवसुतांनी म्हटले आहे.
त्यामुळे
हा प्रश्न मी केला आहे.
पण घाबरू
नकोस,
तुझ्या
कवितांसाठी मी होरपळायला
तयार आहे.
आता तू
नवनवोन्मेशशालिनीप्रज्ञाप्रतिभा
संपन्न असल्यामुळे तुझ्या
कविता या सुंदरच असणार आहेत.
काय गं
मैत्रणी,
तू
कोणत्या प्रकारच्या कविता
लिहितेस?
काsssय?
अगं,
मी तुझ्या
कवितेपायी काव्यवेडा होण्याचे
ठरवले असताना तू ''हायकू''
''कायकू''
लिखती
हैं ?
तुझाच
काव्यवेडा,
प्रेयस
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा