दर्याकिनारी एक रस्ता गं...
प्रिय
मैत्रणी,
अगं,
फोनवर
जांभया काय देतेस?
पहिल्या
पावसाच्या गारव्यानं सुस्त
आली की काय?
आणि
ही काय गुडमॉर्निंगची वेळ
आहे का?
म्हणजे
मी गुडमॉर्निंग म्हणणार आणि
तू थांब हं जरा जांभई देते
म्हणत नंतर थँक्यू म्हणणार...‘काय
तू गाढ झोपली होतीस?
या
गाढ झोपेत स्वप्न पाहात होतीस?
तुला
कधीपासून स्वप्न पडायला लागली.
अगं,
चांगली
गोष्ट आहे ना माझ्यासाठी...’
म्हणजे
कधी तरी सांगशील ‘अरे,
प्रेयस
आज तू स्वप्नात आला होतास असे
म्हणून...
’ ए
सांग ना,
कुठलं
स्वप्न पडलं होतं तुला...?
‘काsssssssय
?’ ‘मी
तुला नव्या होणाऱ्या कोस्टल
रोडवरून पावसात फिरायला घेऊन
जातोय...’
अगं,
मैत्रणी,
नरिमन
पॉइंट ते कांदिवली कोस्टल
रोड हे शिवसेनेचे स्वप्न आहे
गं. ते
तू भाजपने हायजॅक केल्यासारखं
काय करतेस.
या
कोस्टल रोडला मंजुरी देऊन
भाजपने म्हणे श्रेय लाटण्याचा
प्रयत्न केला.
कोस्टल
रोड शिवसेनेने रात्रंदिवस
चर्चा केली आणि एका रात्रीत
हा रोड हायजॅक झाला असं तुला
वाटतं का?
तसं
नाही गं,
कोस्टल
रोडला मंजुरी दिल्यानंतर
मुंबईत ठिकठिकाणी अभिनंदनाचे
पोस्टर्स लागले आहेत.
तुझ्या
अभिनंदनाचे नाही गं...तू
काय राजकारणी आहेस?
मग
कुणाचे काय विचारतेस ?
पंतप्रधान
आणि मुख्यमंत्र्यांच्या
अभिनंदनाचे...काय
आहे, ते
त्यांचे राजकारण आहे.
पालिकेच्या
निवडणुका आल्या आहेत.
तेव्हा
वाद काय आणि श्रेयवाद काय,
तो
उफाळून येणारच.
पण
तुझे स्वप्न मी नक्कीच पूर्ण
करेन...तुला
तुझ्या स्वप्नासह्त हायजॅक
करायला मी एका पायावर तयार
आहे. अगं,
तुझ्या
बापालाही कळणार नाही तुला
हायजॅक केव्हा केले ते.
मग
बसेल बोंबळत,
माझी
मुलगी होती...माझी
मुलगी होती...अगदी
कोस्टल रोडवरून बोंबा मारल्या
जात आहेत ना तशा...
जाऊ
दे...तसा
पण हा कोस्टल रोड सर्वसामान्यांसाठी
किती उपयुक्त ठरेल ते बांधल्यानंतर
आपण पाहूच ...
आणि
मी तुला ३५ किलोमीटर लांब
असलेल्या या मार्गावरून माझ्या
ऑडीतून नेईन हं फिरायला....नको
नको...ऑडी
म्हटलं की जीव घेणारी जान्हवी
आठवते गं.
पण
मी काय म्हणतो,
त्यापूर्वी
आपण वांद्रे-वरळी
सागरी सेतूवरून फ्रीमध्ये
केव्हा जाता येईल ते पाहू या
का? ते
सर्व जाऊ दे,
पण
तुला स्वप पडणं हे माझ्यासाठी
मात्र स्वप्नवत आहे हं.
हे
बघ मेत्रणी,
पाऊस
पडतोय. मी
सफारी घेऊन येतो...नाही
तर एखादी परवडली तर टॅक्सीही
करू आणि दोघंही स्वप्नात
कोस्टल रोडवरून जाताना एका
सुरात गाऊ-
‘दर्याकिनारी
एक रस्ता गो...
वाद
वाढत जाय!’
तुझीच
स्वप्न पूर्ण करणारा,
प्रेयस
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा