शनिवार, १९ नोव्हेंबर, २०११
चल, हटके क्लास काढू
प्रिय मैत्रणी,
गुड मॉर्निंग... अगं ऊठ लवकर... आनंदाची बातमी सांगायची आहे... आता आपल्याला व्यवसायासाठी सुवर्णसंधीच प्राप्त झालीय... कुठली असं काय विचारतेस... न्यूज चॅनेल्स पाहात नाही का तू... अगं, राजसाहेबांनी चक्क आपल्या उमेदवारांसाठी परीक्षा जाहीर केलीय... राज सरांनी क्लासच घेतला म्हणे...आता इच्छुक उमेदवार परीक्षा देणार म्हणजे त्यांना वाचावं-लिहावं लागणार... याचाच साधा अर्थ त्यांना क्लासला जावं लागणार... कोहिनूरने क्लास काढायच्या अगोदर आपला क्लास सुरू झाला पाहिजे... कळलं... आणि हो आपण क्लास काढला तर तो तोट्यात जाणार नाही... कारण काय विचारतेस... अगं, निवडणुकांमागून निवडणुका नाही का होतात... मग नो टेन्शन फक्त अटेन्शन... राजसाहेबांनी परीक्षा घ्यायची ठरवलीय...आपण त्या परीक्षेचा फॉर्म्युला ठरवू... फॉर्म्युला वनप्रमाणे चालेल क्लास... फक्त एकदाच जाहिरात देऊ... उमदेवारांना योग्य प्रशिक्षण देणारा एकमेव क्लास...बघ, रांगाच रांगा लागतील क्लाससमोर...उमेदवारी विद्यार्थ्यांच्या... आणि हो आपल्या क्लासला काय एकाच पक्षाचे थोडे उमेदवार येणार आहेत... सर्वच पक्षांचे उमेदवार हे आपले विद्यार्थी असतील... एका पक्षातून दुस-या पक्षात जाणं हा तर आपल्याकडचा ट्रेण्ड आहे... त्यामुळे आपला क्लास सर्वपक्षीयांना उपयुक्त ठरेल...आणि हो, मी काय म्हणतो, जर आपण उमेदवारीच्या प्रशिक्षणावर पुस्तक काढले ना तर तुफान चालेल...वृत्याच्या वृत्या म्हणजे आवृत्या काढाव्या लागतील... तू काही टेन्शन घेऊ नकोस... हा, आता तू शिक्षकांचा प्रश्न उपस्थित केलास हे बरं केलंस... पण घाबरू नकोस... मी आहे ना खंबीर... आपल्याकडे अनेक जण पदव्या घेऊन बेकार आहेत... येतील ते शिकवायला... बाकी काहीही असो... राजसाहेबांनी परीक्षा घेण्याचा ट्रेण्ड सुरू केला पण मला मात्र माझा व्यवसाय करण्याची नामी संधी मिळाली असं वाटतंय... तुला काय वाटायचं ते वाटो...आणि हो... सांगायचं राहूनच गेलं... माझ्या क्लासचे गेस्ट लेक्चरर असतील कोण... ते मात्र तू गेस करून सांग....
तुझाच क्लासवेडा,
प्रेयस
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
राजकीय नेत्यांचे क्लास घेताय, पण फी मात्र विसरावी लागेल. कारण ते फक्त आश्वासन देतील आणि म्हणतील, निवडून आलो की तुमची मंत्रालयातली कामे ताबडतोब करून देवू. मात्र निवडून आल्यावर विसरून जातील आणि पडल्यावर क्लास तोडतील. त्यामुळे जरा जपून... बाकी कल्पना भन्नाट...!
उत्तर द्याहटवा